महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत- पंतप्रधान

महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वोतोपरी मदत- पंतप्रधान

मुंबई – मुंबईत आज मुसळधार पावसामुळे  अक्षरशः हाहाःकार माजला आहे. परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

मुंबईतील पावसामुळे झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे ट्विटही मोदींनी केले आहे.
आज पावसाने देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अक्षरशः झो़डपून काढले आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मुंबईकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व सुरक्षित जागी थांबावे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 

COMMENTS