महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा राणीच्या बागेतील बंगल्याला नकार!

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा राणीच्या बागेतील बंगल्याला नकार!

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा देण्यात आल्याने महापौरांना राणीबागेमध्ये बंगला देण्याचे महापालिकेने ठरवले आहे. मात्र, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राणीबागेतील बंगल्यात जाण्यास नकार दिलाय.

“राणी बागेतील बंगला देण्याऐवजी मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला द्यावा,” अशी मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. यासंबंधी महापौरांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहिलं आहे.

यासंदर्भात त्यांनी आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून मलबार हिल इथला बंगला महापौर निवासस्थानासाठी देण्याची मागणी केलीय. राणीची बाग परिसर हा शांतता क्षेत्र असल्याने तिथं विविध कार्यक्रम करण्यावर निर्बंध येणार. महापौर निवासस्थानी होणा-या विविध कार्यक्रमांच्या वेळी कधी कधी ध्वनिक्षेपक लावणे आवश्यक असते. अशावेळी वन्य जीवांच्या शांततेला बाधा निर्माण होईल.

तसेचं महापौर निवासस्थानी दररोज सर्वसामान्य नागरिकांसह अनेक मान्यवर महत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी पाहुणे येत असतात. मात्र या बंगल्याचे क्षेत्रफळही अपुरे असल्यामुळे व पार्किंगसाठीही जागा कमी असल्यामुळे हे निवासस्थान जागेच्या दृष्टिकोनातूनही गैरसोयीचे आहे. महापौरांकडे येणाऱ्यांच्या वाहनांच्या आवाजामुळे राणीबागेमधील प्राणी व पक्ष्यांना त्रास होऊ शकतो असं ही महापौर महाडेश्वर म्हणालेत.

 

COMMENTS