महापौर बंगल्यात शेवटची गुढी उभारली!

महापौर बंगल्यात शेवटची गुढी उभारली!

गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातंय.

 

यंदा मुंबईतल्या दादरच्या महापौर बंगल्यावर शेवटची गुढी उभारण्यात आली. महापौर बंगल्याची जागा आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे या बंगल्यात उभारण्यात आलेली गुढी ही शेवटची ठरणार आहे.
स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षते खालील समितीने महापौरांच्या निवासस्थानाची निवड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी केली आहे. या बंगल्यात शिवसेनाप्रमुख स्मारक झाल्यानंतर मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तुतील महापौरांचा यंदाचा गुढीपाडवा शेवटचा आहे.
मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईचे नवनिर्वाचित महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांनी बंगल्यावर गुढीचे सहकुटुंब पुजन केले. ऐतिहासिक अशा महापौर बंगल्यावरची शेवटची गुढी चर्चेचा विषय ठरली आहे.

COMMENTS