महापौर नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करा –  हायकोर्ट

महापौर नितीन काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करा – हायकोर्ट

पुणे – पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची पुर्नपडताळणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापौर काळजे यांच्या पुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
पिंपरीचे महापौर नितीन काळजे हे चर्होली मोशी प्रभागातून ते निवडून आले आहेत. काळजे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे घनश्याम खेडकर यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली आहे. ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवण्यासाठी काळजे यांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप खेडकर यांनी घेतला आहे. ओबीसींसाठी राखीव असलेल्या महापौरपदावर बसण्याचा त्यांना अधिकार नसून त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी खेडकर यांनी यापूर्वीच केली आहे. जात प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ट आहे. काळजे यांच्या प्रमाणपत्राविषयी जातपडताळणी समितीने दिलेली माहिती अपुरी असून त्याता सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चार महिन्यात हा अहवाल समितीला पाठवायचा आहे.

यासंदर्भात दुजोरा देत महापौर नितीन काळजे म्हणाले की, आपण कुणबी (ओबीसी) असल्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. नव्याने कोणतीही कागदपत्रे न्यायालयाने मागितली नाहीत. मात्र, जातपडताळणी समितीने चार-पाच ओळींचा अहवाल सादर केला होता. तो अहवाल सविस्तरपणे सादर करण्याचे आदेश समितीला दिले आहेत. त्यानुसार सुधारित अहवालासोबत आपल्याकडील सर्व सबळ पुरावे न्यायालयात सादर करणार आहोत.

 

COMMENTS