भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात

जालना: भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कुचे यांच्या स्कॉर्पिओ गाडीने स्कूल बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात आमदार कुचे यांच्यासह 5 जण जखमी झाले आहेत. या अपघातात आमदार कूचे यांच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली आहे. नारायण कूचे यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. नारायण कुचे हे भाजपचे जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

 

COMMENTS