भाजपने सुरू केली निवडणुकीची तयारी !

भाजपने सुरू केली निवडणुकीची तयारी !

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यावर आणि मध्यावधी निवडणुकांच्या सावटामुळे भाजपाने निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे. 6 एप्रिल या भाजपाच्या वर्धापनदिनानिमित्ताने भाजपाने आमदारांना न जिंकलेल्या जागांवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आहे. भाजपाच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात भाजपाने निवडणूक तयारीचा कार्यक्रम आमदारांपुढे ठेवला.

 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघटनमंत्री व्ही सतीश, प्रदेशाध्यक्षांसह भाजपाचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. पुढच्या तयारीला लागा, सध्या कसे दिवस आहेत ते तुम्हांला माहित आहे, असं सांगत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमदारांना तयार राहण्याचे आदेश दिले.

 

जनता हुशार आहे एका दिवसात लाल दिव्याच्या गाडीतून सायकलवर आणेल. पारदर्शकता भाषणापुरती नाही प्रत्यक्षात आणवी लागेल असे टोले आमदारांना हाणले.  नेत्यांनी स्वतःच्या प्रेमात राहू नये. जनतेने मोठं केलं म्हणून पक्ष आहे. पक्षाने मोठं केलं म्हणून आपण आहात हे लक्षात ठेवा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढच्या काळात जनतेशी कसा संपर्क ठेवायचा याचंही मार्गदर्शन आमदारांना करण्यात आलं.  येत्या 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती भाजप आमदारांनी निवासी प्रवास दौरे करावे असे निर्देश देण्यात आले. भाजपचे आमदार असलेल्या आणि नसलेल्याही विधानसभा क्षेत्रात जाऊन जनता, कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी आमदार, मंत्रीनी घ्याव्यात असं सांगण्यात आलंय. 14 एप्रिलला भीम अँप कसे उपयुक्त आहे हे लोकांना सांगावं. 14 एप्रिलला शहरातील मुख्य चौकात स्टॉल लावुन भीम अँप ची माहिती द्यावी अशा सूचना आमदारांना करण्यात आल्या आहेत.

COMMENTS