“भाजपने माझ्या हत्येचा कट रचला होता”

“भाजपने माझ्या हत्येचा कट रचला होता”

‘माझ्या हत्येचा कट भाजपने रचला होता, असा गंभीर आरोप बहुजन समाज पक्षाच्या आध्यक्ष मायावतींनी केला आहे. सहानपुरमधील हिंसा भाजपनेच घडवल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सोमवारी मेरठमध्ये त्या बोलत होत्या. ‘महाराणा प्रताप जयंतीच्या वेळी हत्येचा कट आखला होता. या कार्यक्रमात फुलन देवी यांचा मारेकरी शेर सिंह राणा हा देखील होता. दलितांवर होत असलेल्या अत्याचारामुळे मायावती सहानपूरमध्ये येतीलच त्यावेळी हिंसेदरम्यान हत्या करायची असा कट होता. पण त्यांच्या कटाबाबत आधीच माहिती मिळाली आणि त्यांचा कट उधळला’, असे मायावती म्हणाल्या.

दलितांवरील अत्याचाराबाबत बोलू न दिल्याने नाराज झालेल्या मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

 

COMMENTS