ब्रेकिंग न्यूज – तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी !

ब्रेकिंग न्यूज – तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी !

पुण्याच्या पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचं पत्र मुंडे यांना आलंय. या प्रकरणी सध्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे पत्र नेमकं कोणी पाठवलं हे अजून समजलं नसलं तरी पुण्याच्याच सुखसागरनगर या भागातून हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.  तुकाराम मुंडे हे एक कार्यक्षम आएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

COMMENTS