प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एकदिवसाच्या नागपूर दौ-यावर येत आहेत. दीक्षाभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष समारोहास ते उपस्थित राहणार आहेत. तसंच कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.  मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. डिजीधन मेळावाचा समारोप आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी या विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करुन तिथे ते भाषणही करणार आहेत.

COMMENTS