पुण्यातील कचरा समस्यावर पंतप्रधान मोदींनी स्वतः लक्ष घालावे – सुप्रिया सुळे

पुण्यातील कचरा समस्यावर पंतप्रधान मोदींनी स्वतः लक्ष घालावे – सुप्रिया सुळे

पुणे – फुरसुंगी कचरा डेपो प्रश्नी कोणताही तोडगा निघत नसल्याने उरुळी व फुरसूंगी ग्रामस्थांनी कचरा डेपोची अंतयात्रा काढत आज सलग 20 व्या दिवशी आंदोलन कायम सुरू ठेवले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही सहभागी झाल्या. तसेच कचरा प्रश्नी विरोधकांनीही सत्ताधा-यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

यावेळी ग्रामस्थांच्या आंदोलनात सुप्रिया सुळे यांनी सहभागी होत याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, कचरा प्रश्नावर मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला नाही. तसेच देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावे आणि यावर मार्ग काढावा.

COMMENTS