परभणीत त्रिशंकू स्थिती, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 18 जागा, शिवसेना चौथ्या क्रमांकावर

परभणीत त्रिशंकू स्थिती, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 18 जागा, शिवसेना चौथ्या क्रमांकावर

परभणी – गेल्यावेळी नंबर एकचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत जोरदार धक्का बसला असून काँग्रेसने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र त्यांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. बहुमतासाठी 33 जागा असताना त्यांना 31 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादीला 30 जागा होत्या. त्यामध्ये 12 ने घट झाली आहे. तर काँग्रेसनं 23 वरुन 31 वर झेप घेतली आहे. भाजपच्या जागा 2 वरुन 8 झाल्या आहेत. मात्र स्थानिक तगडं नेतृत्व आणि खासदार, आमदार यांचं बळ असतानाही शिवसेना चौथ्या क्रमांकवर फेकली गेली आहे.

COMMENTS