पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेचा उद्या निकाल

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेचा उद्या निकाल

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव या तिन्ही महानगरपालिकेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.  या  महानगरपालिकेवर कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिन्ही पालिकांसाठी 24 मे रोजी मतदान झालं होतं. उद्या या तिन्ही महानगरपालिकेची मतमोजणी होणार आहे, भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 55 टक्के मतदान झाले होते . भिवंडी- निजापूर महानगरपालिकेसाठी 53, मालेगाव महानगरपालिकेसाठी 60, तर पनवेल महानगरपालिकेसाठी 53 टक्के मतदान झाले होते .

COMMENTS