पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्र्यांवर भाजप खासदाराची सडकून टीका !

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्र्यांवर भाजप खासदाराची सडकून टीका !

नागपूर – भाजपचे खासदार नाना पटोले यांनी यांचा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजप खासदारानी सडकून टीका  केले आहेत. ‘केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या सरकारला खासदारांची किंमत नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे केंद्राच्या निधीबाबत विषय उपस्थित केला तर त्यांनी खासदारांची बैठक बोलावणेच बंद केले. अशी टीका पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री विदर्भाचा असो की कुठल्याही भागाचा मुख्यमंत्री पद मिळाले की तो व्यक्ती बदलतो, असही पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये आयोजीत विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रृ या कार्यक्रमात खासदार नाना पटोले बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी यांना मी त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतीचे वास्तव सांगितले तर मोदी माझ्यावर भडकले, कारण त्यांना असे काही ऐकण्याची सवय नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

 

COMMENTS