पंढरपूरच्या मंदिरात हाणामारी करणारे दोन कर्मचारी निलंबित, मंदिर समितीच्या अध्यक्षांची कारवाई

पंढरपूरच्या मंदिरात हाणामारी करणारे दोन कर्मचारी निलंबित, मंदिर समितीच्या अध्यक्षांची कारवाई

मंदार लोहोकरे यांचेकडून….

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मधील दोन कर्मचाऱयांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविक सोडण्याच्या कारणावरून या कर्मचाऱ्यात हाणामारी झाली. याची गंभीर दाखल घेत समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी त्या दोन कर्मचाऱयांना निलंबित केले. नारायण वाघ आणि पांडुरंग साळुंखे  या कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ.अतुल भोसले यांनी २१ जून रोजी घेतली. यामध्ये मंदिराचे पावित्र्य न राखणार्यावर कारवाईचे संकेत अध्यक्षांनी दिले होते. मात्र गेली अनेक वर्षे मंदिर समितीमधील काही कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार सुरु आहे. यामध्ये दर्शनाला सोडणे,कोणतीही शिस्त न पाळणे , अरेरावी आशा अनेक तक्रारी काही कर्मचाऱयांच्या होत्या. यामध्ये दोन कर्मचार्याची हाणामारीच्या घटनेची भर पडली.

समिती मधील नारायण वाघ आणि पांडुरंग साळुंखे या दोन कर्मचाऱयांनी ” आपली माणसे ” दर्शनासाठी मंदिरात सोडवण्यासाठी आली होती. यावेळी सुरवातीला या दोघांमध्ये बाचाबाची झाली. पुढे हा वाद विकोपाला जाऊन हाणामारीत झाले. या घटने नंतर मंदिर परिसरात चर्चा होऊ लागली. या प्रकरणी मंदिर समितीचे पूर्ण वेळ कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी तात्काळ याची माहिती घेतली .या बाबत समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी या दोन कर्मचाऱयांना तडकाफडकी निलंबित केले. एकंदरीत समितीचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी चार दिवसांपूर्वीच अध्यक्षांनी स्वीकारली आहे. आणि समितीच्या कर्मचाऱयांना कामात हयगय कराल तर कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते. त्या नुसार अध्यक्षांनी कारवाई करून कृती देखील करू शकतो हे यातून स्पष्ट केले आहे. आता असे गैरवर्तन करणारे अजून कोण कोण आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी वारक-यांतून होत आहे.

देवाच्या दारात गैरप्रकार खपवून घेणार नाही  – डॉ अतुल भोसले 

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतानाच मंदिरात गैरकारभार चालून घेला जाणार नाही असे मी जाहीर केले होते.मात्र या घटनेंत दोन कर्मचारी दोषी आढळून आले त्यांच्या वर निलंबनाची कारवाई केली. मंदिरात दर्शनाला येणार्या भाविकांना सेवा द्या. चांगले वर्तन ठेवा.देवाच्या दारात गैरप्रकार चालून घेतला जाणार नाही  असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी सांगितले .

COMMENTS