नारायण राणे आज एनडीए प्रवेशाबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

नारायण राणे आज एनडीए प्रवेशाबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

नारायण राणे आज एनडीएत सामील होण्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या पक्षाची पुढची व्यूहरचना राणे आता सिंधुदुर्गात आखणार आहेत.

आज संध्याकाळी पाच वाजता नारायण राणे सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ते एनडीए मध्ये कधी समाविष्ट होतील आणि त्यांना कोणतं खातं मिळेल याची चर्चा आता सर्वत्र सुरु झालीय.

राणे एनडीएत प्रवेश करतात का आणि त्यानंतर त्यांचं कसं स्वागत केलं जात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS