नारायण राणेंचे आज शक्तीप्रदर्शन, राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य !

नारायण राणेंचे आज शक्तीप्रदर्शन, राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य !

कुडाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आज कुडाळमध्ये येणार आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीने बरखास्त केली आहे. राणेंना कोणतीही माहिती न देता जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करुन जिल्हाध्यक्षपदी विकास सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यावर राणेंनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाण हे काँग्रेस संपवायला निघाले आहेत. त्यांनाच आपण संपवणार अशा शब्दात त्यांनी चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केलाय.  सुरूवात त्यांनी केली आहे शेवट मी करणार या शब्दात त्यांनी हल्लाबोल चढवला आहे.

या पार्श्वभूमीवर राणे पहिल्यांदाच कुडाळमध्ये येत आहेत. दुपारी साडेबारा वाजता ते गोव्यात पोहचतील तर तिथून पुढे 4 वाजता कुडाळमध्ये पोहचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राणे समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. राणे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. भाजपमध्ये जाण्याविषयी ते काय बोलतात याचीही उत्सुकता लागली आहे.

COMMENTS