नरेंद्र मोदी यांचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भरभरुन कौतुक !

नरेंद्र मोदी यांचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भरभरुन कौतुक !

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरुन कौतुक केलंय. मोदीं सारखा पंतप्रधान लाभणे हा सन्मान आहे अशा शब्दात ट्रम्प यांनी मोदींवर कौतुकांचा वर्षाव केला. आर्थिकदृष्ट्या भारत मोदींच्या नेतृत्वाखाली खूप प्रगती करतोय असंही ट्रम्प म्हणाले. मोदींसारख्या पंतप्रधानांचं स्वागत करणे हा सुद्धा एक गौरव आहे अशा भाषेत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं. जोरदार स्वागत केल्याबद्द मोदींनीही ट्रम्प यांचे आभार मानले. त्याला उत्तर देताना मोदी यांनी हा आपला सन्मान नसून देशातल्या सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान असल्याचंही सांगितलं. नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत.

COMMENTS