नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांवर मात, इन्स्टाग्रामवर मोदी जगात अव्वल !

नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांवर मात, इन्स्टाग्रामवर मोदी जगात अव्वल !

इन्स्टाग्राम या फोटोशेअरिंग अपवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वाधिक फॉलोअर असलेले नेते बनले आहेत. मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम यांच्यावर आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या 68 लाख 3 हजार 576 इतकी झाली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम 63 लाख 76 हजार 699 फॉलोअर्ससह दुस-या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी मोदी या यादीत तिस-या क्रमांकावर होते. एका वर्षात त्यांनी हा पहिला क्रमांक पटकावला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क कंपनी बर्सन-मार्सटेलरने ही यादी बनवली आहे. जगभरातील ३२५ नेते व अन्य मुख्य इन्स्टाग्राम अकाउंट्सचा या कंपनीने अभ्यास केला. गेल्या १२ महिन्यांत या नेत्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो, त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि फॉलोअर्सच्या संख्येत झालेली नेमकी वाढ या सर्व बाबी तपासून त्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.

मोदींच्या अकाउंटवर गेल्या वर्षभरात अवघे ५३ फोटो पोस्ट करण्यात आले असतानाही त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. प्रत्येक फोटो साधारण २ लाख २३ हजार लोकांनी पाहिला तर एका पोस्टला सरासरी १ लाख ४१ हजार कमेंट आणि लाइक्स मिळाले. या यादीत तिसऱ्या स्थानी पोप फ्रान्सिस आहेत. त्यांचे ३७ लाख २६ हजार ५६८ फॉलोअर्स आहेत तर चौथ्या स्थानी व्हाइट हाऊस (३४ लाख ७५ हजार ६७५ फॉलोअर्स) आहे.

COMMENTS