दाऊद आणि केंद्र सरकारची सेटलमेंट –  राज ठाकरे

दाऊद आणि केंद्र सरकारची सेटलमेंट – राज ठाकरे

मुंबई -“दहशतवादी दाऊद इब्राहीम याला भारतात येऊन मरायचे आहे. यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करतोय”, असा खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

‘अंडरवर्ल्ड डॅान दाऊद इब्राहीम हा सध्या विकलांग अवस्थेत आहे.भारतात प्रत्यार्पण करण्याची त्याची तयारी आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत श्रेय लाटण्यासाठी दाऊदला भारतात आणून निवडणूका जिंकण्याचा सरकारचा डाव आहे.’ असे ही राज ठाकरे म्हणाले . रविंद्र नाट्य मंदिरात फेसबुक पेजच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी गुरुवारी स्वत:च्या फेसबुक पेजचे (www.facebook.com/RajThackeray)अनावरण केले. या कार्यक्रमात राज  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  तसेच माहित नसलेल्या गोष्टी समोर आणण्यासाठी फेसबुक पेजचा वापर करणार असल्याचे राज यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे  twitterवरील फॉलोअर्स फेक असल्याचे राज यांनी सांगितले. मोदी यांचे 48 टक्के तर गांधी यांचे 54 टक्के फॉलोअर्स फेक असे राज म्हणाले.

राज ठाकरे यांनी फेसबुक पेज सुरु केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याला 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले होते.

 

COMMENTS