थेट जनतेतून पहिली महिला सरपंच होण्याचा मान भाजपला !

थेट जनतेतून पहिली महिला सरपंच होण्याचा मान भाजपला !

पुणे जिल्ह्यातील जनतेतुन निवडुन आलेली पहिली महिला सरपंच होण्याचा मान भारतीय जनता पार्टीच्या बावधन गावातील सौ. पियुषा किरण दगडेपाटील यांना मिळाला.

चुरशीच्या निवडणुकीत पियुषा  दगडे यांनी 40 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. आज  हा निकाल घोषित करण्यात आला. पियुषा यांना 2300 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिक्षा दगडे यांना 2260 मते मिळाली.

पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक मा.किरण दगडेपाटील,मा.सरपंच बबनराव दगडेपाटील,मा.पोलीस पाटील बबनराव दगडेपाटील,माजी सरपंच राहुल दुधाळे,बापुसाहेब दगडेपाटील,सुनिल दगडेपाटील यांनी पॅनल तयार करून सरपंच पदासाठी त्यांची पत्नी सौ.पियुषा किरण दगडेपाटील यांना उमेदवारी दिली.

भाजपा,शिवसेना व रिपई पुरस्कृत ग्रामदैवत श्री बापुजीबुवा परीवर्तन पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार पियुषा किरण दगडेपाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान सरपंच निलेश दगडे यांची भावजय सौ.प्रतिक्षा श्रीकांत दगडे यांचा पराभव केला.जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सविता दगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप दगडे,माजी सरपंच सुदाम दगडे,माजी सरपंच सुदाम भुडे, माजी उपसरपंच तानाजी दगडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोरख दगडे यांनी उभ्या केलेल्या पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. विद्यमान सरपंच निलेश दगडे यांच्या मातोश्री वंदना दगडे व मा.उपसरपंच गणेश दगडे यांचाही ह्या निवडणुकीत दारून पराभव झाला.

 

COMMENTS