जेंव्हा माजी मुख्यमंत्री दंड भरण्यास RTO मध्ये येतात !

जेंव्हा माजी मुख्यमंत्री दंड भरण्यास RTO मध्ये येतात !

सोलापूर – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे चक्क सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरण्यासाठी आले होते. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला आहे.  गुरुवारी ( 26 जुलै) सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुशीलकुमार शिंदे स्वता: येऊन  2560 रुपये दंड भराला आहे.        

सुशीलकुमार शिंदे यांची  11 नोव्हेंबर 1964 मध्ये मोटरसायकल व चार चाकी वाहनाचे काढलेल्या परवानाच्या नुतनीकरणाची मुदत संपली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी कार्यालयात येऊन वाहन परवाना नुतनीकरणाची प्रक्रिया पार पाडली.

शिंदे यांनी गुरुवारी सकाळी 11.30 वाजता आरटीओ कार्यालयात येऊन शिंदे यांनी स्मार्ट कार्ड लायसन्स काढले. 2012 पासून वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने शिंदे यांना एकूण 2560 रुपये दंड भरावा लागला. यावेळी कायदा व नियम सर्वांना समान आहेत. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, अशी प्रतिक्रिया दंड भरल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

COMMENTS