गुजरातमध्ये आता चाणाक्यांच्या लढाईचा पार्ट 2, डिसेंबरमध्ये पुन्हा पटेल शहा यांच्यात जंग !

गुजरातमध्ये आता चाणाक्यांच्या लढाईचा पार्ट 2, डिसेंबरमध्ये पुन्हा पटेल शहा यांच्यात जंग !

नवी दिल्ली – गुजरातमध्ये राज्यसभेची झालेली निवडणुक देशभरात गाजली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची कोंडी करण्यासाठी मोदी शहा यांनी जंग जंग पझाडलं. काँग्रेसचे बंडखोर नेते शंकरसिंह वाघेला यांच्या मदतीनं पटेलांची नाकाबंदी केली. मात्र शेवटी अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमद पटेल यांची बाजी मारली. ते काँग्रेससाठी हिरो ठरले. त्यामुळे पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेल्या काँग्रेसमध्ये काही प्रमाणात जान आली आहे.

गुजरातमधली ती अवघड जागा विपरती परिस्थिती जिंकणा-या अहमद पटेल यांच्याकडे गुजरात विधानसबा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरंतर राहुल गांधी यांचं आणि अहमद पटेल यांचं अजिबात पटत नाही असं बोललं जातंय. तरीही राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्र सोपवली आहेत. गुरूवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अहमद पटेल यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे. पहिली लढाई पटेल यांनी जिंकली असली तरी आता दुसरी लढाई त्यांच्यासाठी सोपी नाही.

COMMENTS