कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणातील आरोपपत्राबाबत काय म्हणाले सुनील तटकरे ?

कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणातील आरोपपत्राबाबत काय म्हणाले सुनील तटकरे ?

मुंबई – रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणात एसीबीने नुकतेच ठाणे सत्र न्यायालयात 3 हजार पाणी आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्रात 6 अधिका-यांची नावे आरोपी म्हणून आहेत. तटकरेंचं ना मात्र आरोपींमध्ये नसलं तरी आरोपपत्रात आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे.

या प्रकरणी बोलताना त्यांनी आज 2014 पासून या प्रकरणी आपली चौकशी सुरू आहे. डिसेंबर 2014 मध्ये सरकारने आपली चौकशी केली आहे. तेंव्हापासून  मी चौकशीत सहकार्य करतोय. ही  बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे आणि या प्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे आपल्याला याबाबत अधिक बोलायचे नाही असंही तटकरे यांनी सांगितलं.

COMMENTS