केजरीवाल- कमल हसन भेट, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण !

केजरीवाल- कमल हसन भेट, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण !

दिल्‍लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चेन्‍नईत प्रसिद्‍ध अभिनेते कमल हसन यांच्या घरी जाऊन आज भेट घेतली. या भेटीने  राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीनंतर कमल हसन आपच्या प्रवेशाच्या चर्चाही होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच कमल हसन यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि हसन यांची भेट झाली. केजरीवाल आणि हसन यांच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही भेट म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणात आपच्या प्रवेशाची शक्यता मानली जाते आहे.

 

 

COMMENTS