एकनाथ खडसे लवकरच मंत्रिमंडळात परतणार ?

एकनाथ खडसे लवकरच मंत्रिमंडळात परतणार ?

माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करणा-या झोटिंग आयोगाने आपला गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे सूपुर्द केला आहे. या अहवालात खडसे यांच्याविरोधात काही ताशेरे ओढण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या फौजदारी कारवाईची शिफारस मात्र करण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच खडसे यांचा मंत्रिमंडळातला प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्याच्यातील अटींमुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्याच्यावरुन सरकाराल पुन्हा घेरलं जाण्याची शक्यता आहे. मित्र पक्ष शिवसेनेही सरकारविरोधात आक्रमक आहे. विरोधकही पुन्हा सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या तोफगोळ्याला मुख्यमंत्र्यांशिवाय सध्या चंद्रकांत दादा पाटील हेच एकमेव नेते तोंड देत आहेत. त्यामुळेच खडसेंसारखा व्यक्ती मंत्रीमंडळात हवीच अशी मुख्यमंत्र्यांचीही मानसिकता झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री तयार झाल्याचंही बोललं जातंय. परवा पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात खडसे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले होते. यावरुन एकनाथ खडसेंचा एक वर्षाचा वनवास संपवून ते पुन्हा सरकारमध्ये परतील अशी चिन्हं आहेत.

COMMENTS