एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर संंघर्ष यात्रेचं जोरदार स्वागत, उलट–सुलट चर्चेला उधाण !

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर संंघर्ष यात्रेचं जोरदार स्वागत, उलट–सुलट चर्चेला उधाण !

जळगाव –  जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजाहून दुस-या टप्प्यातली निघालेली विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा आज जळगाव जिल्ह्यात आली. तेंव्हा या संघर्ष यात्रेनं भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील घोडसगाव फार्म हाऊसवर धडक दिली. ही यात्रा येताच विरोधी नेत्यांचे खडसे यांनी जोरदार स्वागत केलं. या यात्रेत  अजित पवार,  राधाकृष्ण विखे पाटील,  जयंत पाटील,  राजेश टोपे यांची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही यावेळी उपसथित होते. स्वागत समारंभ झाल्यानंतर सर्व नेत्यांनी, पोहे,  जिलेबी,  फाफड़ा यांचा नाष्टा केला. यावेळी एकनाथ खडसे विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सहभागी झाल्याचं चित्र होतं. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विरोधकांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना घेरलं असताना खडसेंच्या काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS