उस्मानाबादमध्ये खा. गायकवाड यांच्या समर्थनात बाईक रॅली,  शहरासह जिल्हा बंदची हाक

उस्मानाबादमध्ये खा. गायकवाड यांच्या समर्थनात बाईक रॅली, शहरासह जिल्हा बंदची हाक

उस्मानाबाद –  एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड अद्याप ही गायब आहेत. मात्र आता त्यांच्या समर्थनात त्यांच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबादेत बंदची हाक पुकारत बाईक रॅली काढली आहे. 

 

या प्रकारानंतर रवींद्र गायकवाड यांना सर्व एअर लाईन्सने ब्लॅक लिस्ट केलं आहे. त्यामुळे त्यांना विमान प्रवासावर बंदी आलेली आहे. दिल्लीहून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने ते मुंबईसाठी रवाना झाले होते. मात्र ट्रेनमधून वापीला उतरले असल्याची शक्यता आहे. मात्र गायकवाड हे कुठे आहेत कोणालाही अदयाप कळलेलं नाही.

COMMENTS