उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर

उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर

उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजाराच्या जातमुचलक्यावर उदयनराजे यांना जामीन मंजूर झाला आहे.  1 दिवसआड उदयनराजे यांनी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले आहे. पुढील सुनावणी 2 तारखेला होणार आहे.

उदयनराजे आज स्‍वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलीसांनी उदयनराजे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. उदयनराजेंना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. उदयनराजेंच्या अटकेनंतर सातारा शहरात नागरिकांकडून उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि खंडणी मागितल्या प्रकरणी खासदार उदयनराजे आणि त्यांच्या 9 साथीदारांवर 22 मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 9 जणांना पोलिसांनी 23 मार्चला अटक केली होती मात्र तेंव्हापासून उदयनराजे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उदयनराजे काही दिवसांपूर्वी अचानक साताऱ्यात प्रकटले आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सातारा शहरात रोड शो केला आणि पुन्हा गायब झाले. अखेर आज सकाळी ते स्वतःहून सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं. न्यायालयीन त्यांना कोठडी सुनावली होती. त्यानंतर उदयनराजे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शहरात जाळपोळ केली. शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शहरातील ही व्यवस्था बिघडू नये म्हणून न्यायालयाने दुपारी दुसरी सुनावणी घेत उदयनराजेंना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 

COMMENTS