आषाढी यात्रेची कामे पूर्ण करण्यात यंत्रणा कुचकामी

आषाढी यात्रेची कामे पूर्ण करण्यात यंत्रणा कुचकामी

नियोजनाचा अभाव,कामे उरकण्यात प्रशासन दंग 

पंढरपूर : कोणतेही आमंत्रण नाही,कोणतेही निमंत्रण नाही…उन्ह वारा पाउस याची तमा न बाळगता समतेची पताका  खांद्यावर घेवून वैष्णवांचा मेळा पायी पंढरीला चालत येतों. शेकोड वर्षाची परंपरा  आजही सुरु आहे. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी केंद्र,राज्य सरकार भरीव निधी जाहीर करतो.तर आषाढी यात्रेसाठी प्रशासन महिनाभर आधी नियोजन करीत असते. पालकमंत्री,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,प्रमुख माह्राज मंडळी आदिच्या बैठका होतात. यात्रेची कामे पूर्ण करण्याची ” डेड लाईन ” निश्चित केली जाते. प्रत्यक्षात कामे पूर्ण करण्यात यंत्रणा कुचकामी ठरते. अगदी वारकरी पंढरीत दाखल होत असताना कामे उरकण्यात प्रशासन दंग असते. 

लाखो वैष्णावांचे  श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठूर्याचे लोभस रूप डोळ्यात साठविण्यासाठी आणि भेटीची आस मनात धरून वारकरी मोठ्या श्रध्येने येतात. येणारे वारकरी हे प्रामुख्याने शेतकरी वर्ग असतो. साधारतः मृग नक्षत्र म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. कि पेरणी करायची आणि मग आषाढी यात्रेला पायी चालत यायचे हा नित्यकर्म आहे. या वारकर्यांना पायी चालत येताना अनेक सोयी सुविधा देण्यासाठी केंद्र,राज्य आंनी स्थानिक स्वराज्य संस्था निधी दिला जातो.

आषाढी यात्रा हि जून महिन्यात येते. त्या आधी एक महिना प्रशासन या य्त्रेची तयारी करण्यासाठी बैठका घेण्यास सुरवात केली जाते. या बैठकीत गेल्या  वेळेस झालेल्या चुका,नव्याने कोणत्या सोयी देता येते याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर विभागीय आयुक्त हे बैठक घेवून यात्रा काल्वाधीतील विविध कामांची ” डेड लाईन ” जाह्रीर करून चुका करणाऱ्या अधिकार्यावर कारवाई केली जाईल असे जाहीर केले जाते. याच बैठकीत आप आपल्या विभागाचे यात्रेतील कांचे पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन सादर करून  वरिष्ठांना काम करतोय असे दाखवून देतात. प्रत्यक्षात अगदी वारकरी पंढरीत दाखल होत असतात त्या वेळे पर्यंत कामे सुरु असतात.

आज मितीला पंढरपुरात अनेक विकास कामे सुरु आहेत. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांना राहण्यची सोय केली जाते. यःठीकाणी जागो जागी काटेरी झाडे आणि गवत उगवली आहेत. तर याच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शौचालय उभी करण्यात आली आहेत. या शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही. जर मोठा पाउस आला तर या ठिकाणी चिखल होऊ शकतो. या सार्या बाबत प्रशासनाल विचारले असता शौचालयासाठी पाण्यचे टँकर उभे करणार आहेत. आणि काटेरी झाडे आणि गवत एक दोन दिवसात काढले जातील असे राजकीय पुढार्याला शोभेल असे उत्तर अधिकारी देतात. अशीच काही परिस्थिती चंद्रभागा नदीची आणि वाळवंटाची पाहवयास मिळते. नदी पात्र वाहते नसल्याने पात्रातील पाण्यावर शेवाळे आणि घाणीचे तवंग आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणत पान गवत आहेत. चार दिवसापूर्वी पालिका प्रशासन नदी स्वच्छ करणार होती. मात्र तीही अद्याप प्रून झाली नाही. असे असले तरी नदीपात्रातील कड्डे बुजवून पालिका प्रशासनाने खूप मोठी कामगिरी केल्याचे सांगत आहे.

शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यातील काही रस्ते यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचा घिसाड घाई प्रशासनाकडून सुरु आहे. तर काही  ठिकाणी रस्त्याविर्ल खड्डे बुजवले खरे मात्र पायी चालताना त्यावर पसरलेल्या कच खडी वरून चालत ये जा करावे लागत आहे. वाखरी येथील पालखी तळावरहि अशीच परिस्थिती आहे. येथे शौचालय उभी केली आहेत. या ठिकाणी पाणी आणि लाईट नाही. अशी अनेक कामांची यादी आहे. मात्र या बाबत प्रशासन गंभीर नाही.प्रशासनाला दोष देवून प्रश्न सुटणार नाहीत. मात्र एकीकडे कोट्यावधी रुपये सरकार देत असेल तर त्याचा विन्योग चांगला व्हावा. या साठी काम करणारे अधिकारी आणि प्रशासन हवे आहे. अवघ्या काही दिवसावर वारी येवून ठेपली आहे. त्यमुळे बा….विठ्ठला तूच आता भाविकांना साभाळून घे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

COMMENTS