आता वेळ आलीय हे माझं सरकार नसल्याचे सांगण्याची – अजित पवार

आता वेळ आलीय हे माझं सरकार नसल्याचे सांगण्याची – अजित पवार

मुंबई –  ‘तीन वर्षापूर्वी सत्तेवर आलेले सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कर्जमाफी नाही, शेतमालाला भाव नाही, महागाई वाढली, जीएसटी गोंधळामुळे व्यापारी हैराण आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे, कुपोषण वाढले आहे, विद्यापीठ निकाल गोंधळ आहे. एकाही पातळीवर सरकार चांगले काम करता आलेलं नाही.’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारवर केली आहे.

‘आता वेळ आलीय हे माझं सरकार नसल्याचे सांगण्याची,  ग्रामीण भागांत लोक तेच बोलतायत हे माझं सरकार नाही, हे सरकार फक्त जाहीराती देतंय, आमच्या काळात घेतलेल्या लाभाच्या जाहीराती हे सरकार देतंय.’ असा टोलाही पवारांनी लागवला.

सांगलीची घटना सरकारसाठी लाजिरवाणी, हे धाडस पोलीस करू कसे शकतात. पोलीस दलातील काही अधिकार्यांना गर्व आहे आपले कुणी काही करू शकत नाही. एक मंत्री म्हणतात दारूच्या ब्रॅण्डला महिलाचे नाव द्या. एक मंत्री म्हणतात मिडियाला पैसे देऊन बातम्या मॅनेज करा, कशाची मस्ती आली, कसले एवढे धाडस करतात. असे म्हणत पवारांनी सरकारवर ताशेरे ओढले.

 

 

 

COMMENTS