अन् शरद पवारांनी पुणे वेधशाळेला दिली 100 किलो साखर !

अन् शरद पवारांनी पुणे वेधशाळेला दिली 100 किलो साखर !

पुणे – राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होत चालली होती. हवामान खात्याने अनेक अंदाज वर्तवले तरी ते चुकीचे ठरत होते. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नव्हतं. 19 तारखेला शरद पवार बारामतीमध्ये होते. त्यावेळी त्यांना राज्यातल्या दुष्काळी स्थितीवर प्रश्न विचारला तेव्हा राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे हे सांगतानाच हवामान खात्याने एक दोन दिवसात पाऊस पडेल असं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर एकदा विश्वास ठेऊ आणि त्यांच्या अंदाजानुसार पाऊस पडला तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं.

हे वक्तव्य केल्यानंतर दुस-याच दिवशी  संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे मग पवारांनी कबुल केलेली साखर हवामान खात्याला कधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली. आता ही बारामतीची साखर आज दुपारी चार वाजता पुणे वेधशाळेत दिली आहे. शरद पवारांनी 100 किलो  साखर बारामतीहून पुण्याला पाठवून दिली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्येकर्ते ते पोतं आज पुण्यातील वेधशाळेत दिले आहे.

COMMENTS