…अन्यथा कार कंपन्यांवर बुलडोझर फिरवू – गडकरी

…अन्यथा कार कंपन्यांवर बुलडोझर फिरवू – गडकरी

पर्यावरणपूकर गाडय़ा बनवा अन्यथा कार कंपन्यावर बुलडोझर चालवू ,पेट्रोल -डिझेलच्या गाडय़ा बनवणाऱयांचा बॅण्ड बाजा वाजवणार, असा दम केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कार कंपन्यांना दिला आहे. सिऍम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.

वीजेवर चालणाऱया गाडय़ांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार आहे.त्यामध्ये वाहने चार्ज करणाऱया स्टेशन्सचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व कार कंपन्यांनी 2030 पर्यंत इलेक्ट्रिक कारच्या दिशेने वाटचाल सुरू करण्याचा सल्ला नितीन गडकरींनी दिला. ‘सरकार कोणत्याही परिस्थितीत तेल किंवा पेट्रोल, डिझेलवर चालणाऱया गाडय़ांपासून सुटका करू इच्छित आहे.त्यासाठी 2030 पर्यंतची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन वाढवले नाही,तर पेट्रोल,डिझेलवर चालणाऱया आणि धुर सोडणाऱया गाडय़ा आणि कंपन्यांववर बुलडोझर चालवला जाईल, असे गडकरी म्हणाले.

 

COMMENTS