अजित पवार यांना विजय शिवतारे यांचे जोरदार प्रत्युत्तर

अजित पवार यांना विजय शिवतारे यांचे जोरदार प्रत्युत्तर

भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती असून या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्यावर बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी कडाडून टीका केली आहे.

शिवसेना दुतोंडी गांडुळ असल्याची टीका अजित पवारांनी कल्याणमध्ये केली होती. त्याला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सडतोड प्रत्युत्तर दिले असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची वाट लागल्याचेही शिवतारे यांनी यावेळी म्हटले.
बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असे म्हटले. या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

COMMENTS