अखेर गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

अखेर गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला –   भाऊसाहेब देशमुख विद्यालयात अनधिकृतपणे जाऊन तेथील दस्तावेजाची फेकाफेक करीत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या तक्रारीवरून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांच्याविरुद्ध मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी शनिवार घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जात तेथील कर्मचाऱ्याला शिविगाळ करीत मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी संजय देशमुख यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण निरिक्षक आत्माराम राठोड यांना सोबत घेऊन भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन तपासणी केली. पाटील हे महाविद्यालयाची तपासणी करत असताना शाळेचे प्राचार्य संजय आठवले हे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग घेत होते. त्यावर व्हिडीओ शुटींग कशाला घेता असे म्हणत पाटील यांनी प्राचार्य व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद एवढा वाढला की व्ही. एन. पाटील यांनी शाळेतील कर्मचारी अमोल काळे यांना कानशिलात लगावली. तर प्राचार्य आठवलेंना शिवीगाळ केल्याचा सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

अखेर मुर्तिजापूर पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी व्ही. एन. पाटील यांच्याविरुद्ध कलम 323, 504 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

COMMENTS