बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर, तेजस्वी यादवांची भाजपपेक्षा जास्त जागांवर आघाडी !

बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर, तेजस्वी यादवांची भाजपपेक्षा जास्त जागांवर आघाडी !

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.सुरुवातीच्या काही राउंडमधून समोर आलेल्या माहितीनुसार काही प्रसिद्ध चेहऱ्यांची पिछेहाट झाली आहे. निकालाचा पहिला कल तेजस्वी यादव यांच्या बाजूने दिसत आहे. कारण तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांचा पक्ष 68 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 58 जागांवर आघाडीवर आहे.

एकूण जागा – 243

एनडीए – 125

महागठबंधन – 105

इतर – 10

———

महागठबंधन

आरजेडी – 73

काँग्रेस – 23

इतर – 12

एनडीए

जेडीयू – 50

भाजप – 66

व्हीआयपी – 01

इतर – 06

मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.

COMMENTS