मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांच्या हेतूवर प्रश्न : सचिन सावंत

मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांच्या हेतूवर प्रश्न : सचिन सावंत

मुंबई:मराठा आरक्षण प्रकरणी येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर राहिले होते. त्यावरून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे तर बैठकीला आले नाहीत ना, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केली आहे.

‘मुळातच राज्य सरकारने मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकरणावर आयोजित बैठकीला एका केंद्रीय मंत्र्याने दांडी मारणे चुकीचे आहे. त्यांच्या सोयीनुसार बैठकीची वेळ बदलण्यात आली होती. तरीही ते अनुपस्थित राहिले. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या गैरहजेरीबाबत दिलेले स्पष्टीकरण अधिकच संतापजनक आहे. या बैठकीला केंद्र सरकारचे मंत्री उपस्थित राहिले असते तर ते एका बाजूने असल्याचा संदेश गेला असता, हे फडणवीसांचे विधान आश्चर्यकारक आहे,’ असं सांगत, सचिन सावंत यांनी भाजपच्या हेतूवर संशय व्यक्त केला.

COMMENTS