गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर जहरी टीका

गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर जहरी टीका

पुणे : जेजुरी संस्थानच्या वतीनं जेजुरी गडावरील पायरी मार्गावर अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण सोहळा उद्या दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होता. मात्र, भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर पडळकर यांनी काही कार्यकर्त्यांसह आज पहाटेच हा सोहळा उरकून टाकला. व्हिडिओ ट्वीट करून त्यांनी याची माहिती दिली आहे. ‘फटाक्यांच्या आतषबाजीत, हालग्यांच्या कडकडाटात, खंडेरायाच्या साक्षीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पडळकर म्हणाले, ‘शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं हे खरं आहे. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसानं अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, या पुतळ्याचं अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळं आम्हीच हा सोहळा पार पाडला.

पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांचं काम अखंड भारतात आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांचं काम आहे. शरद पवार यांची प्रतिमा बरोबर उलटी आहे. अहिल्यादेवी प्रजाहित दक्ष होत्या. पवार हे नेमके प्रजेच्या विरोधी आहेत. वाईट प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान आहे. म्हणून आज आम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलंय.”अहिल्यादेवी आणि आपल्या विचारात तफावत आहे हे शरद पवार यांनी समजून घ्यावं आणि यापुढच्या काळात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावताना हजारदा विचार करावा,’ असंही पडळकर यांनी सांगितलं.

यावर प्रतिक्रिया देत असताना जितेंद्र आव्हाड यांनी गोपिचंद पडळकरांना इशारा दिला. अशा प्रकारे टिका करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रकारे पुन्हा टिका केली. तर त्याच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असे आव्हाड यांनी सांगितले. पडळकरांनी एखाद्या चोरासारखं पहाटेच्या अंधारात अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांच्यात हिंमत होती तर दुपारी अनावरण करायचं. सांगून करायचं. उद्या साहेब तिथं येणार आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा. तुम्हाला पुन्हा कदाचित उभंही राहता येणार नाही,’ असा इशारा आव्हाड यांनी पडळकरांना दिला.

COMMENTS