अटकेत असताना राष्ट्रवादी पक्षाकडून कोणत्याही प्रकारे माझी दखल घेतली गेली नाही. यामुळे आगामी काळात मलाही पक्षात राहायचे की नाही याबद्दल विचार करावा लागणार आहे. असे वक्तव्य आमदार रमेश कदम यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केल आहे. त्यामुळे रमेश कदम राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का अशा चर्चेला तोंड फुटले आहे.
माझ्यावरील आरोप खोटे आहेत की, खरे याची साधी चौकशीही पक्ष नेतृत्वाने केली नाही. पक्षाने माझी कोणतीही दखल घेतली नाही. मी कोणताही अपराध केलेला नाही, महामंडळाचे सर्व व्यवहार हे चोख ठेवले आहेत. पोलिसांना झालेल्या शिवीगाळीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, त्या पोलिसांनीही माझ्या कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचेही आता उघड झाल आहे अशी माहिती रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
COMMENTS