दिल्ली – शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन राज्यात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. अल्पभूधारक शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र विरोधकांना आणि शेतकरी संघटांना मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय मान्य नाही. सरसकट कर्जमाफी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. आता या विरोधकांच्या सुरात सूर चक्क भाजपच्या खासदारानं मिसळला आहे. भाजपाचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी हवी आहे अशी मागणी केली आहे. तसंच शेतक-यांचं हे आंदोलन महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असंही मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. शेतक-यांच्या मागण्या मान्य करायलाच हव्या असंही नाना पटोले म्हणाले.
COMMENTS