शरद पवारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला कार्यकर्त्यांशी संवाद, भाजपला केली ही विनंती!

शरद पवारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला कार्यकर्त्यांशी संवाद, भाजपला केली ही विनंती!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सैन्याच्या त्यागाचा गैरफायदा घेऊ नका अशी विनंतीही त्यांनी भाजपा नेतृत्वाला केली आहे. राफेल विमानं खरेदी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफोर्स प्रकरणात भाजपाने चौकशी करण्याची मागणी केली होती. तेव्हा संसदीय कमिटी नेमून चौकशी करण्यात आली. राफेलबाबत वेगवेगळी माहिती दिली जात असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.

तसेच ना खाऊंगा, ना खाने दुंगा वायद्याचं काय झालं अशी विचारणाही यावेळी शरद पवार यांनी केली आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर विरोधीपक्षांची बैठक झाली तरी पंतप्रधान आपले कार्यक्रम सभांमधून विरोधकांवर हल्ला करत होते, मतं मागत होते असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS