पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीर आव्हान केलं आहे. जर शरद पवारांनी आदेश दिला तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढेल आणि जिंकून दाखवेन असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला आहे.तसेच निवडणूक हारलोच तर पवारांची औलाद सांगणार नाही असं देखील अजितदादांनी म्हटलं आहे. अजितदादांची याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून ते शिरुरमधील एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान अजित पवारांचं हे आव्हान शिरूरचे विद्यमान शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी स्वीकारलं असून अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्याशी ठाम राहावं फक्त माघार घेऊ नका असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS