डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर धनंजय महाडिक यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया!

डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर धनंजय महाडिक यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया!

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष खऱ्या अर्थाने जनमानसात रुजला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचा आजवरचा सामाजिक आणि राजकीय अनुभव, विकासाची दृष्टी आणि सर्वाना सोबत घेऊन पुढे जाण्याची पद्धत, यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. माननीय डी. वाय. दादा यांच्यासारख्या बुजुर्ग, ज्येष्ठ आणि महनीय नेत्यांना राष्ट्रवादी पक्ष जवळचा वाटणे, हेच या पक्षाचे यश आहे. डी. वाय. दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने,मला मनस्वी आनंद होत आहे,कारण त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मला आणखी बळ मिळणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांचा आशीर्वाद मला लाभेल, याची खात्री आहे. आणि मी हे पण नम्रपणे सांगू इच्छितो, की राजकारण वगळून काही घडामोडी असतात. शह- काटशह हे राजकारणात असतात. पण वैयक्तिक आयुष्यात आम्ही कधीच कुणावर डूख धरला नाही. आताही मी या घडामोडी राजकारण न समजता, मला मिळणारे सकारात्मक संकेत समजतो. भारतीय लोकशाहीतील राज्यपाल सारखे अती महत्त्वाचे पद भूषविलेले दादा, आता आमच्या पक्षाचे सदस्य बनले, हा आनंदाचा क्षण आहे.

दादांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकत आणखीन वाढेल. त्यांचे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब, यांचे आशीर्वाद मला लाभतील , याचा मला आणखी आनंद आहे. माझ्या पुढील निवडणूक लढवण्यासाठी आज मला आणखी बळ मिळाले आहे, ते आमचे नेते, खासदार शरद पवार यांच्यामुळेच असही यावेळी महाडिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS