4 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेकडे जाणार पद?

4 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, शिवसेनेकडे जाणार पद?

मुंबई – येत्या 30 तारखेला विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणुका जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या 4 वर्षापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेनं दावा केला होता, पण भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

हे पद आता शिवसेनेला दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली होती . त्यानंतर लगेच निवडणूक जाहीर झाल्याने या बैठकीत या पदाबाबत चर्चा करण्यात आली असल्याचंही बोललं जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जात असल्याचं बोललं जात असून यामध्ये शिवसेनेलाही खूश करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याची चर्चा आहे.

COMMENTS