“मुख्यमंत्र्यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच”

“मुख्यमंत्र्यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच”

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, आधुनिक फडणवीस सुद्धा पेशवाईतील फडणविसांसारखेच पडद्यामागून सारी सूत्रे हलवतात. पण त्याचा सूत्रधार नेमका कोण, हे शेवटपर्यंत कळत नाही. साहित्यिक व विचारवंतांच्या अटकेच्या समर्थनार्थ राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदा घेतल्या. या प्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारची आणि पोलिसांची कानउघाडणी केली. तरीही या पत्रकार परिषदांबाबत मुख्यमंत्री मौन धारण करून बसले आहेत. त्यांचे हे मौनच ते या पत्रकार परिषदांचे मूळ आयोजक असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, घरात पुरोगामी महापुरूषांच्या तसबिरी लावणेही गुन्हा झाल्याचा हल्लाबोल विखे पाटील यांनी केला. साहित्यिक डॉ. वरावरा राव यांच्या मुलीच्या घरी फुले-आंबेडकरांच्या तसबिरी लागलेल्या होत्या. त्यांच्याकडे धाड घालणाऱ्या पुणे पोलिसांनी त्या मुलींना तुम्ही फुले-आंबेडकरांच्या तसबिरी का लावता?असा प्रश्न विचारला. लोकांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नाही, तर संभाजी भिडे अन् डॉ. जयंत आठवलेंच्या तसबिरी लावायच्या का?  असा सवालही त्यांनी केली.

COMMENTS