मुंबई – भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांकडून राम कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबतचं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं असून आ. राम कदम यांच्या महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही. यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे असे समजावे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
आ. राम कदम यांच्या महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही. यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे असे समजावे का?#जवाबदो @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @raosahebdanve @ramkadam @BJP4Maharashtra pic.twitter.com/pqPN1A6KdF
— Supriya Sule (@supriya_sule) September 7, 2018
दरम्यान दहीहंडीच्या दिवशी राम कदम यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राम कदम यांच्यासह भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी राम कदम यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर राम कदम यांनी राज्यातील महिलांची माफी मागितली. परंतु याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला असून महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही. यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे असे समजावे का? असं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS