नवीन महाराष्ट्र सदनाचं बांधकाम मीच केलं आणि बळीही आमचाच गेला, छगन भुजबळांनी मांडली व्यथा !

नवीन महाराष्ट्र सदनाचं बांधकाम मीच केलं आणि बळीही आमचाच गेला, छगन भुजबळांनी मांडली व्यथा !

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज अनेक वर्षानंतर नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात गेले आहेत. यावेळी छगन भुजबळ यांनी आपली व्यथा मांडली आहे. याच सदनाच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांवरून त्यांना तुरूंगात जावं लागलं होतं. त्यावरुन त्यांनी आपली व्यथा मांडली असून नवीन वास्तू उभारली की पूर्वी बळी देण्याची प्रथा होती. या सदनाचं बांधकाम मी केलं आणि त्यात भुजबळ कुटूंबीयांचा बळी गेला असल्याची व्यथा भुजबळ यांनी व्यक्त केली.

दरम्यान आज छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात गेले आहेत. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ यांनी आपली व्यथा मांडली आहे. पूर्वी नवीन इमारत उभारली की बळी देण्याची प्रथा होती. परंतु या सदनाची इमारत मी बांधली आणि यात आमच्या कुटुंबाचा बळी गेला असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS