नवी दिली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना पाहण्यासाठी देशभरातील नेत्यांनी एम्सकडे धाव घेतली आहे. त्यांचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची पुतणी क्रांती मिश्रा या देखील दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी क्रांती मिश्रा यांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळाला दिला. तसेच वाजेपेयी यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहायचं आहे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते, अशी मागणी क्रांती मिश्रा यांनी केली आहे.
I have been praying to god that just once I can see him give a speech again. Our family can never ever erase that image of his from our minds. I hope he gets well soon: Kanti Mishra, Niece of #AtalBihariVaajpayee pic.twitter.com/vxhz7ur1fZ
— ANI (@ANI) August 16, 2018
दरम्यान अटल बिहाली वाजपेयी हे नक्की बरे होतील अशी मला खात्री असल्याचं पुतणी कांती मिश्रा यांनी म्हटलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एम्स रुग्णालयानं दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन रुग्णालयाकडून सादर करण्यात आलं असून वाजपेयी यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ९३ वर्षीय वाजपेयी यांना ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती आहे.
COMMENTS