नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या नाशिकच्या विधानपरिषद जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत असून शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी सहाणे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान शिवसेनेने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सहाणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती त्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने, त्यांची लढत आता नरेंद्र दराडे यांच्याविरोधात असणार आहे.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)
भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)
भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)
COMMENTS