बंगळुरु – भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे सध्या कर्नाटकातील प्रचार रॅलींमध्ये व्यस्त झाले आहेत. या रॅलीदरम्यान राज्यात ते भाजपची ताकद वाढवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. परंतु अशातच त्यांची डोकेदुखी वाढत असल्याचं पहावयास मिळत आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच शाह यांनी येडियुरप्पा सरकार भ्रष्ट असल्याचं चुकून म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्या अनुवादकानं मोठी चूक केली असून मोदी सरकार देश बरबाद करतील असं म्हटलं आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांकडून होत असलेल्या या चुकांमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान धारवाड जिल्ह्यातील दावणगिरीमधील प्रचारसभेत बोलताना अमित शाहांनी कर्नाटकातील सिद्धरामय्यांवर निशाणा साधला. अमित शाहा म्हणाले की, “कर्नाटकातील काँग्रेसने राज्यात कोणतेही विकासाचं काम केलं नाही. त्यामुळे तुम्ही मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान करा. परंतु शाहांचा कन्नड अनुवादक आणि भाजप उमेदवार प्रल्हाद जोशीने अमित शाहांच्या भाषणाचा अनुवाद करताना मोदींजवळ दलित आणि मागसवर्गीयांसाठी कोणतंही व्हिजन नाही. ते देशाला बरबाद करतील असं म्हटलं आहे.
COMMENTS