नवी दिल्ली – एकत्रित निवडणुकांसाठी लवकरच कायदा करणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी एनडीए घटक पक्षांसमोर एकत्रित निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी कायदा करावा लागणार असून याबाबत संसदेत लवकरच कायदा आणला जाईल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकांनतर महिनाभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जाव्यात तसेच एनडीए घटक पक्षांनी सहकार्य करुन एकत्रित निवडणूक घेण्याबद्दल लोकांना पटवून देण्याचं आवाहनही मोदींनी केलं आहे.
COMMENTS